मालवण/-

मालवण बाबी जोगी यांना गॉगल गॅंग म्हणणारे आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. जोगी यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. मात्र कोळंब पुलाच्या खाली जे प्रकार घडले त्याबाबत मनसे पुराव्यानिशी बोलली तर जोगी यांच्या तिजोरीत कसा खडकडात होईल. याचा विचार त्यांनी करावा. असा सणसणीत टोला मनसे महिला शहर अध्यक्षा भारती वाघ यांनी लगावला आहे.मालवण ग्र|मीण रुग्णालयात डॉ. बालाजी पाटील हे एकच डॉक्टर कोरोना काळातही २४ तास सेवा बजावत आहेत. कर्मचार्यांचीही कमीच आहे. डायलेसीस सेंटर बंद आहे. जिल्हा शल्य चिकित्सक मनमानी करत येथील कर्मचारी यांना जिल्हा रुग्णालयात वर्ग केले आहे. जिल्हा रुग्णालयातील कारभाराचीही हीच स्थिती आहे. या विरोधात मनसे आंदोलन छेडणार असल्याने आमदार व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अपयशी कारभाराची पोल खोल होईल या भीतीने शिवसेना मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी पोपटपंची सुरू केली आहे. भर पावसातही डोळ्यावर काळा गॉगल घालून फिरणाऱ्या बाबी जोगी यांनी गॉगल काढल्यास रुग्णालयातील समस्या व आमदारांच्या अपयशी कारभार स्पष्ट दिसेल. असा टोलाही वाघ यांनी लगावला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाघ यांनी बाबी जोगी यांच्यावर सडकून टीका केली आहे. जोगी यांनी मनसेच्या तिजोरीची काळजी करण्यापेक्षा आपली तिजोरी आपण वेळोवेळी कशी भरली याची चौकशी तर कोण लावणार नाही ना याची काळजी करावी. जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनाची भूमिका घेत असताना जोगी यांना मिरच्या का झोबल्या. असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी स्तरावर काही डॉक्टर,नर्स,कर्मचारी निश्चितच चांगली सेवा देत आहेत. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी रुग्णसेवा करत आहेत. दिवसरात्र सेवा बजवणाऱ्या या डॉक्टर,नर्स,कर्मचारी यांच्या यशाची चादर आपल्यावर पांघरून जर कोणी आपले अपयश लपवत असेल, रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर अश्या जिल्हा स्तरावरील आरोग्य व्यवस्थेबद्दल तसेच स्थानिक आमदारांच्या अपयशाबाबत मनसे आवाज उठवणारच. म्हणूनच ७ सप्टेंबरला जिल्हा रुग्णालया समोर होणारे आंदोलन आपली पोलखोल करेल या भीतीने शिवसेनेने पोपटपंची सुरू केली आहे. असेही वाघ यांनी स्पष्ट केले. असे सांगत तूर्तास एवढेच पुरे आहे. वेळ आल्यास अथांग समुद्रातील गोष्टीही बाहेर काढाव्या लागतील. असाही टोला भारती वाघ यांनी लगावला आहे.

🔸डॉक्टरांच्या मेहनतीचे कौतुकच..
मालवणचे वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील यांच्या अहोरात्र मेहनतीबद्दल आम्ही नेहमी कौतुकच केले आहे. जनतेला माहीत आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक त्यांना मेमो पाठवून, कर्मचाऱ्यांची बदली करुन त्यांचे खच्चीकरण करत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या ढिसाळ कारभारामुळे काल ०५.०९.२०२० रोजी ११ डाॕक्टर आणि नर्स पाॕजिटीव्ह आले आहेत.जिल्हा शल्यचिकित्सक यांचा हा कारभार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांची पोलखोल करण्यासाठी मनसेचे आंदोलन आहे.असेही वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page