वेंगुर्ला शहरातील ४० व्यक्ती कोरोनामुक्त;तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १५७

वेंगुर्ला शहरातील ४० व्यक्ती कोरोनामुक्त;तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १५७

अजय गडेकर/वेंगुर्ला.

तालुक्यात आज रविवारी एकूण १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये म्हापण येथील ५ व्यक्ती,वेंगुर्ला भटवाडी येथे ४ व्यक्ती व वेंगुर्ला महाजनवाडी येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.आतापर्यंत वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५७ इतकी झाली असून ८२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या ३६ व्यक्ती Ccc वेंगुर्ला येथे उपचाराखाली असून,२९ व्यक्ती गृहविलगिकरणात,ओरोस येथे ८ व्यक्ती,शिरोडा dch ला २ व्यक्ती आहेत.यामधील वेंगुर्ला शहरात एकूण ६३ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून ४० व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून २३ व्यक्ती उपचाराखाली आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..