कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात काल गुरुवारी कुडाळ शहरात एक व ओरोस येथे १ असे एकूण २ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात ४६९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४५८ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ११ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११४५ तर बरे झालेले रुग्ण १०५९ आणि सक्रिय रुग्ण ४९ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page