जेष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आदर्श शिक्षिका श्रीमती मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्लेत ७ नोव्हेंबरला

जेष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आदर्श शिक्षिका श्रीमती मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्लेत ७ नोव्हेंबरला

वेंगुर्ला /-

सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेल्या ज्येष्ठ समाजसेविका थोर स्त्री समाज सुधारक व साहित्यिका मीराताई जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संस्था तसेच मीराताई जाधव प्रेमी यांच्याकडून शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता वेंगुर्ले येथील महिला काथ्या कामगार संस्थेच्या सभागृहात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
ज्येष्ठ समाज सेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका
मीराताई जाधव ( ९३) यांचे शनिवारी 31 ऑक्टोबर रोजी कोचरा येथे निधन झाले. नाट्यकर्मी दिवंगत बाप्पा धारणकर यांच्या त्या कन्या तर कै. दिनकर धारणकर यांच्या भगिनी, सत्यप्रकाशचे संपादक हर्षवर्धन धारणकर तसेच सत्यजीत धारणकर यांच्या त्या आत्या होत.
स्त्री समाज सुधारक मीराताई जाधव यांनी अनेकांना आपल्या विचाराने मार्गदर्शन केले होते त्यामुळे अनेक संस्थांना प्रेरणा मिळाल्या तसेच पत्रकारिता क्षेत्रातही ही त्यांचे योगदान मोठे असल्याने सर्वांना त्या प्रेरणादायी आहेत मीराताई जाधव यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमास मीराताई जाधव प्रेमी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाच्या संयोजिका प्रज्ञा प्रदीप परब यांनी केले आहे

अभिप्राय द्या..