नवी दिल्ली /-

देशावर ओढावलेले कोरोना संकट अद्याप कायम असून देशभरातील कोरोनाबाधितांची आकेडवारी 83 लाखांच्या पार पोहचली असून कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1,24,315 लोकांनी आपला जीव गमवला आहे. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून सुट्टी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला. पण आता अनलॉकमध्ये काही राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये अनलॉक अंतर्गत शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या होत्या. पण कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणे या राज्याच्या चांगलेच अंगलट आहे. राज्यातील जवळपास 262 विद्यार्थी, तर 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशमध्ये 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. पण मागील तीन दिवसांत जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांच्या कोरोनाबाधित असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page