मालवण /-
कोरोना काळातील माझे शिक्षण
या विषयावर लहान आणि मोठ्या शालेय गटामध्ये निबंध स्पर्धा..मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या “विद्यालय ॲप” या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते आठवी पर्यंत मूल्यमापन परीक्षा गुरुवार दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण मालवण तालुक्यात कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाली

सदर परीक्षेचा उद्घाटन समारंभ ओम साई मंगल कार्यालय कट्टा येथे संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती श्री अजिंक्य पाताडे, उपसभापती श्री सतीश परुळेकर, गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव, गटशिक्षण अधिकारी श्री माने, पंचायत समिती सदस्य सौ मनीषा वराडकर,कमलाकर गावडे,केंद्रप्रमुख कांबळी, विस्तार अधिकारी दीक्षित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लोहार मॅडम,मुख्याध्यापक,शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते
सदर कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले गेले.
प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी श्री माने यांनी केले.गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी हा अभिनव उपक्रम असून शाळा बंद असूनही मालवण तालुक्यात उकृष्ट शिक्षण या विद्यालय ॲप मुळे मिळाले तसेच परीक्षा झाल्यामुळे मुलांची प्रगती समजण्यास हातभार लागल्याचे सांगितले
उपसभापती सतीश परुळेकर यांनी आपल्या नेहमीच्या तडाखेबंद शैलीत भाषण केले.मुलांची प्रगती व्हावी हाच मुख्य दृष्टीकोन आपला आहे असे नमूद केले
सभापती श्री अजिंक्य पाताडे यांनी प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास करण्याचा मनोदय व्यक्त केला.इंग्रजी शाळांच्या तोडीस तोड प्राथमिक शाळांतील मुलं घडवण्याव र भर राहील आणि याकामी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख कांबळी सर यांनी केले.तसेच सूत्रसंचालन श्री सुयोग धामापुरकर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page