वेंगुर्ला /-

वेंगुर्ले उभादांडा-बागायतवाडी रत्नाकर दत्ताराम केरकर प्लेटलेटस कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना रक्ताची तातडीची गरज होती. याबाबत वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष संदेश निकम व सहकाऱ्यांनी व्हॉटसअॅपच्या माध्यमांतून रक्तदात्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील | दोन युवकांनी रात्रीवेळी जिल्हा रुग्णालयात धाव घेत रक्तदान केले.

दोन्ही युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उभादांडा-बागायतवाडी येथील रत्नाकर दत्ताराम केरकर या व्यक्तीचे प्लेटलेटस कमी झाल्याने जिल्हा ग्रामीण रुग्णालयात अॅडमिट केले होते. त्यांना तात्काळ ओ पॉझिटिव्ह ग्रुपच्या रक्ताची गरज होती. ओंकार नाईक, गोपाळ चेंदवणकर (उभादांडा सिद्धेश्वरवाडी) यांनी रात्री ओरोस येथे जात रक्तदान केले. शिवसेनेचे पदाधिकारी कार्मीस आल्मेडा यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page