कुडाळ /-
भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे शनिवार दिनांक ७/११/२०२० रोजी सिंधुदुर्ग येथे येत आहेत. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मधे जिल्हा कार्यकारिणी बैठकीत महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देणे व महिला मार्गदर्शन असा नियोजित कार्यक्रम आहे यावेळी त्यांच्यासोबत मा. सौ अश्विनी जिजकर प्रदेश सरचिटणीस, मा सौ निलम गोंधळी प्रदेश उपाध्यक्षा तसेच कोकण विभाग प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत.
त्याच प्रमाणे माननीय प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे महिलांच्या विविध विषयांवर आधारित पत्रकार परिषद कुडाळ येथे घेणार आहेत. तरी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग च्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यक्रमास वेळेत उपस्थित रहावे.दिनांक ७/११/२०२० मराठा समाज हॉल, कुडाळ सकाळी ११:०० वाजता