आचरा हायस्कुलचे माजीशिक्षक पांडुरंग गावकर यांचे निधन

आचरा हायस्कुलचे माजीशिक्षक पांडुरंग गावकर यांचे निधन

आचरा /-

आचरा गाउडवाडी येथील रहिवाशी वआचरा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अनंत गावकर वय 83 यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आचरा हायस्कूलमध्ये ते इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. इंग्रजी अध्यापनात त्यांचे कार्य आगळे वेगळे असेच होते. आचरा पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. सुरुवातीला मुंबई येथे बीएमसी(BMC) मध्ये त्यांनी नोकरी पत्करली होती. पण गावातील ग्रामस्थ आणि आचरा हायस्कूलचे तत्कालिन संस्थाचालक यांच्या आग्रहास्तव त्यांनी पुन्हा गावी परतत आचरा हायस्कूलमध्ये इंग्रजी अध्यापनाचे काम पत्करले होते. विद्यार्थीवर्गात पी ए गावकर सर अशा नावाने ते परिचित होते. शिक्षकी पेशाबरोबर आचरा गाउडवाडी येथील संभादेवीच्या मंदिरातींल व्यवस्था गेली चाळीस वर्षे ते सांभाळत होते. उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. वाडीत ग्रामस्थ त्यांना आदराने दादा म्हणत.त्यांच्या दुखःद निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, भावजय, पुतण्या नातवंडे,भाचे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..