टायगर ग्रुप कडून अणाव आनंदाश्रम येथे अन्न धान्य वाटप!

टायगर ग्रुप कडून अणाव आनंदाश्रम येथे अन्न धान्य वाटप!

मसुरे /-

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप,सिंधुदूर्ग च्या वतीने अणाव येथील आनंदाश्रम येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी हर्षल बेळेकर,प्रयाग कांबळे,सुरज भाेसले,दिनेश आंगणे,वैभव वळंजू,तुषार सावंत,मंदार गावडे,विरेश वळंजू आदी टायगर ग्रुप सिंधुदूर्ग चे पदाधिकारी उपस्थित हाेते.
पुढील काळात काेणतीही मदत लागल्यास टायगर ग्रुप सिंधुदूर्ग नेहमी सहकार्य करेल याची ग्वाही यावेळी देण्यात आली.यावेळी आश्रमाचे संचालक परब काकांनी टायगर ग्रुप सिंधुदूर्ग चे आभार मानले.

अभिप्राय द्या..