डाँ.रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेस कडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश.;

डाँ.रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेस कडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश.;

सिंधुदुर्ग-/समील जळवी
प्राणी मित्र डाँ रविंद्रनाथ रेडकर यांनी पकडुन ठेवलेल्या मगरीला वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेससिंधुदुर्गकडुन वनविभागाच्या साथीन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश,आले आहे सावंतवाड़ी सातार्डा मधिल घटना.सातार्डा देऊळवाडी येथे शांताराम तुळसकर यांना सायंकाळच्या सुमारास ओढ्यामध्ये भली मोठी मगर निदर्शनास आली. त्यांनी वेळ न लावता मगर आल्याची बातमी स्थानिक प्राणी मित्र डाँ रेडकर यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मगरीची पाहणी करुन मागील 1पाय अर्धवट नसल्याच लक्षात आल्यावर लगेचच याची माहीती वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्यु सर्विसेस सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अनिल गावडे यांना दिली. वन्यजीवांच्या बचावासाठी सदैव तत्परतेने कार्य करत असलेली टीम कुडाळहुन काही वेळातच सातार्ड्यात दाखल झाली, डाँ . रेडकर यांनी या मगरीला स्थानिक रहिवाशांच्या साथीने पकडुन ठेवलं होतं, वाईल्ड लाईफ च्या टीमने अखेर या मगरीला ताब्यात घेतल.
अंदाजे दोनशे ते अडीजशे किलो वजनाच्या या मगरीला दोनशे मिटर दुर असलेल्या रस्त्यावर उचलून नेण या टीम ला शक्य नव्हत, अखेर वाईल्ड लाईफचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी स्थानिक रहिवाशांसमोर मदतीची हाक मारली, आणि रहिवाशांनी या हाकेला उत्सफुर्त प्रतिसाद देऊन या मगरीला रस्त्यावर आणण्यास मदत केली. यावेळी गावडे यांनी सहकार्य केल्या बद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
मगर रेस्क्यु झाल्यानंतर गावडे यांनी सावंतवाड़ी क्षेत्राचे उप वन क्षेत्रपाल गजानन पानपट्टे साहेबांना याची माहीती फोन द्वारे दिली, आणि नंतर संबधित अधिकाऱ्यांच्या समक्षच या मगरीला पुन्हा तीच्या नैसर्गिक अधिवासात सोडुन देण्यात आले. अंदाजे या मगरीची लांबी चौदा ते पंधरा फुट आणि वय सोळा ते सतरा वर्षे असावं असा अंदाज तीच्या शेपटीवरुन घेण्यात आला. ऐव्हढी मोठी मगर पकडुन सुरक्षित सोडण्याची ही वाईल्ड लाईफ टीम ची पहीलीच वेळ.वन्यजीवांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेली वाइल्ड लाईफची टीम सदैव संबंधित विभागास एकप्रकारे मदतच करत असते. याची दखल प्रशासनाने घेऊन त्यांच्या कामाची किमान पोच पावली तरी त्यांना द्यावी असे आदेश संबंधित विभागाला तसेच स्थानिकांना मगरीचे फोटो सोशल मीडयावर व्हायरल न करण्याचे आदेश गावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले.या वेळी वाईल्ड लाईफ च्या टिमचे अध्यक्ष अनिल गावडे वैभव अमृस्कर, ओमकार लाड, डॉक्टर प्रसाद धुमक, सिध्येश ठाकुर आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..