अमित वेंगुर्लेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी..राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश !

अमित वेंगुर्लेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी..राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश !

सावंतवाडी /-

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एक हुशार वेक्तिमहत्व सामजिक कार्यकर्ते ह्युमन राईट प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आज शिवबंधन बांधत,जाहीर शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे समर्थक असलेले श्री.अमित वेंगुर्लेकर हे राणेंसोबत काँग्रेस,नंतर स्वाभिमान पक्ष त्यानंतर भारतीय जनता पक्ष आसा प्रवास करत त्यांनी भाजपला आता सोड चिट्टी दिली आहे.तालुक्यातील भाजपच्या संघटना,व नेत्यांवर नाराज असल्याने श्री.अमित वेंगुर्लेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समजते.अमित वेंगुर्लेकर यांना मानणारा युवा वर्ग मोठया प्रमाणावर आहे.याचा फायदा शिवसेना पक्षाला नक्कीच होईल याबद्दल दुमत नाहीच.सदरचा शिवसेना प्रवेश हा,वेंगुर्लेकर यांनी हल्लीच शिवसेनेत दाखल झालेले श्री. रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.अमित वेंगुर्लेकर यांनी आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कुडाळ येथील मेळाव्यात हा प्रवेश केला आहे.

अभिप्राय द्या..