भाजपला शिवसेनेने दिला दणका..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील पिंगळी पंचायत समिती मतदारसंघाच्या विद्यमान सदस्य, कट्टर राणे समर्थक समजल्या जाणाऱ्या निलिमा वालावलकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे हा प्रवेश घेण्यात आला.भाजप पक्षाला व नारायण राणेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
कुडाळच्या पंचायत समितीच्या सभापती यांनी शिवसेना पक्ष सोडल्या नंतर आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे सदस्य आपल्या संपर्कात असल्याचे जाहीर केले होते.निलिमा वालावलकर यांच्या पक्ष प्रवेशाने आमदार वैभव नाईक यांचे ते वाक्य अधोरेखित झाले आहे.
यावेळी संदेश पारकर, संजय पडते,नागेंद्र परब,हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, राजन नाईक,संतोष शिरसाट, अतुल बंगे जयभारत पालव, राजन जाधव, श्रेया परब, आदींसह कुडाळ मालवण मधील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page