कुडाळ /-

परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव या महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

पाटील गणपत 85%, सावंत अथर्व 82%, तेंडोलकर बापू 80% या विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविण्याचा मान पटकाविला.या यशामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे पंचक्रोशीमध्ये अभिनंदन केले जात आहे.शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे अध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन पाटकर, प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. या यशामध्ये महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वर्षा देसाई रुपनर व माजी वाणिज्य विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य प्रा. हृषीकेश धुरी यांचे विशेष योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page