ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी वैशाली नाईक

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी वैशाली नाईक

सावंतवाडी /-

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सावंतवाङी, वेगुर्ला, दोडार्माग या विभागासाठी वैशाली सखाराम नाईक (ग्रामपंचायत-पेंङूर, ता. वेगूर्ला) यांची विभागीय अध्यक्षपदी निवड जिल्हा कार्यकारणीच्या सभेत जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर व सचिव सूहास बार्ङेकर यांनी जाहीर केली.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे सेवा विषय समस्या व तक्रारीचे निवारण होऊन कर्मचार्‍यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा संघटनेने महत्वपुर्ण निर्णय घेतला असून जबाबदारी निश्चित केली आहे. विभागीय अध्यक्षपदाची मुदत ही जिल्हा संघटनेच्या कार्यकारणी पर्यंत अस्तित्वात राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा संघटनेचे सहसचिव हनूमान केदार यांनी निर्गमित केले आहेत.

अभिप्राय द्या..