कुडाळसाठी कोरोनाची दिलासादायक बातमी..

कुडाळसाठी कोरोनाची दिलासादायक बातमी..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात गेल्या दोन दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेले नाहीत. तालुक्यात ४६८ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४४८ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या २० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११४१ तर बरे झालेले रुग्ण १०११ आणि सक्रिय रुग्ण ९३ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..