मालवण /-

मालवणातील ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा सन्मान पत्र प्रदान व सत्कार सोहळा रविवार १ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता लोकनेते आर. जी. चव्हाण हॉल वायरी मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजसेविका सौ. मिथिला नागवेकर या उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता वाडये, अभिनेत्री सौ. प्रतिभा चव्हाण, अभिनेत्री काजल वालावलकर या उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार होणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पा चव्हाण आणि संस्थापक श्री. संतोष लुडबे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page