प्राधिकरण सदस्य महेश (छोटू) पारकर यांच्या प्रयत्नांना यश..

ओरोस /-

कोविड -19 च्या काळात प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक, टपरी व्यवसाय यांचे गेल्या सहा महिन्यांचे भाडे माफ करावे यासाठी प्राधिकरण सदस्य महेश (छोटू) पारकर यांच्या प्रयत्नाने तसेच त्यांच्या मागणीवरून व व्यापारी असोसिएशन ओरोस बु. सिंधुदुर्गनगरी यांचे दि. ०९/१०/२०२० च्या पत्राने प्राधिकरणला मागणी केली होती. या पत्रातील मागणीप्रमाणे आज दि. २८/१०/२०२० च्या बैठकीमध्ये माहे मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० (६ महिने ) चे प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक, टपरी व्यवसाय यांचे भाडे माफ करण्यात आले.
व्यापाऱ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेतल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, तसेच उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव, तथा अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे छोटू पारकर यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page