कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार ऐकून ०६ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात २ रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात ४ रुग्ण आढळले.
कुडाळ तालुक्यात आज बुधवारी ६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ २, अणाव १, मुळदे १, कसाल १, हुमरस १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४६१ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४३५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या २६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११३७ तर बरे झालेले रुग्ण ९९६ आणि सक्रिय रुग्ण १०४ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page