▪️नुकतेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘शरद पवार साहेब, hats off अशा आशयाचं ट्विट करत शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

▪️पंकजा मुंडे यांनी ट्वीटमध्ये शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.

▪️या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाच्या परिस्थितीत इतके दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटते.

▪️पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.

▪️ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित बैठकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते.

▪️शरद पवार यांच्या कौतुकाचे ट्विट आणि बैठकीत धनंजय मुंडे यांच्या शेजारी बसणं यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page