बांदा /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील
एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात अल्पावधीत सिंधुदुर्ग जिल्हयात आपले नाव जिल्ह्यातील काना कोपऱ्यात सर्व गावात शेती अवजारे यांच्या माध्यमातून पोचलेली “नंदाई ट्रॅक्टर्स ” यांचा गोवा राज्य पासून काही अंतरावर असलेल्या बांदा येथील शाखेचे उदघाटन १९ ऑक्टोबर रोजी दिमाखात झाले आहे.बांदा येथे आता “नंदाई ट्रॅक्टर्स ” ची सेवा सुरू झाली आहे.

कुडाळ येथून कृषी औजारे पुरवठा करणारे सुसज्ज दालन सुरू करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती बागायतदार व शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्राद्वारे शेती करण्यासाठी प्रवृत्त करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर टाकण्यात नंदाई ऍग्रो शॉपी व नंदाई ट्रॅक्टर्सचा मोठा वाटा आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत अनुदान तत्त्वावर मिळणारी ट्रक्टर्स सह सर्व कृषी औजारे नंदाई ट्रॅक्टर्सने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. अल्पावधीतच जिल्ह्यातील शेतकरी, उत्पादक व उद्योजक या साऱ्यांच्या पसंदिस उतरलेल्या नंदाई ट्रॅक्टर्सने आता बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपली सुसज्ज ट्रॅक्टर्स व शेती औजारांची शाखा बांदा येथे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बांदा येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १, बांदेश्वर मंदिर रोड, बांदा याठिकाणी हे प्रशस्त शेती औजारांचे दालन सुरू झाले असून बांदा, दोडामार्ग मधील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदाई ट्रक्टर्सचे मालक प्रीतम शिरसाठ यांनी केले आहे.शेतकऱ्यांना लागणारी सर्व अवजारे,ताडपत्री,शेती अवजारे ग्राहकांना माफक किमतीत नंदाई ट्रक्टर्सचे मालक प्रीतम शिरसाठ यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत आता बांदा, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील लोकांना गोवा येथे जाण्याची गरज नाही ,”नंदाई ट्रक्टर्स ” शॉप मद्धे आपणास सर्वच शेती विषयक अवजारे येताच छताखाली मिळतील असे लोकसंवाद लाईव्ह शी बोलताना श्री.प्रीतम शिरसाट यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page