नवी दिल्ली /-
देशातली करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला, तरी देखील अद्याप करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४६ हजार ७९१ नवे करोनाबाधित आढळले असून, ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाख ९७ हजार ६४ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण ७५ लाख ९७ हजार ६४
करोनाबाधितांमध्ये ७ लाख ४८ हजार ५३८ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ६७ लाख ३३ हजार ३२९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १५ हजार १९७ जणांच्या संख्येचा समावेश आहे.