मुंबई /-
माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या २२ तारखेला खडसे मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्यासोबत त्यांची कन्याही प्रवेश करणार आहे.
दरम्यान, दोनच दिवसापूर्वी खडसे यांनी मि भाजपचा राजीनामा दिलेला नाही अजूनही पक्षातच आहे असे विधान केले होते तर शरद पवार यांनी खडसे यांना निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले होते त्यामुळे प्रवेशाबाबत संदिग्धता होती. आता मात्र औपचारिकता पुर्ण झाल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.