रुग्णवाहिकेसाठी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध…

रुग्णवाहिकेसाठी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध…

मालवण /-

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेला मालवण पालिकेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज दोन ऑक्सिजन सिलिंडर स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. याबाबत तालुका शिवसेनेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पुनम चव्हाण, महिला तालुका आघाडी प्रभारी दिपा शिंदे, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनिता जाधव, किसन मांजरेकर, बंड्या लुडबे, उमेश मांजरेकर, महेश मेस्त्री, किशोर गावकर, मनोज मोंडकर, बाळु नाटेकर, सुरेश मड्ये इतर शिवसैनिक उपस्थित होते

अभिप्राय द्या..