उपसरपंच आबा खवणेकर यांच्या पाठपुराव्यातून उपलब्ध झाली सँनिटायझर मशिन..
वेंगुर्ला/-
वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावातील रेशन धान्य दुकानास वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते,जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष,जिल्हा बँक संचालक विलास गावडे आणि वेंगुर्ला तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत यांच्या माध्यमातून सँनिटायझर मशिन आणि सँनिटायझर बाँटल भेट देण्यात आली आहे.
हाताचा स्पर्श न करता सँनिटायझरचा वापर करता येईल अशी अत्याधुनिक मशिन रेशन धान्य दुकानास भेट देण्यात आली.पँडलचा वापर करून सँनिटायझरचा उपयोग करता येणारी हि मशिन असून कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व रेशन धान्य दुकानावर येणार्या नागरिकांना आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने हि मशिन उपयुक्त ठरणारी आहे.
केळुस गावचे उपसरपंच व पत्रकार श्री आबा खवणेकर यांच्या विनंतीवरून आणि पाठपुराव्यामुळे हि मशिन विलास गावडे आणि विधाता सावंत यांच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानास देण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच आबा खवणेकर,केळुस रेशन धान्य दुकानाचे सेल्समन जगन्नाथ उर्फ तात्या पावसकर,केळुस वि.का.सह.सेवा सोसायटीचे संचालक दादा प्रभू,सचिन मुणनकर,दयानंद गोसावी,विजय वेंगुर्लेकर,उमेश मुणनकर,रेशन दुकानाच्या लिपिक कु.पुजा केळुसकर,सौ.लक्ष्मी आजगावकर,रेशन दुकानाचे मापारी सज्जन राऊळ,आनंद आंदुर्लेकर,चंद्रकांत मुणनकर,चंद्रशेखर मुणनकर आदी ग्रामस्थ व रेशन धारक यावेळी उपस्थित होते.