दशावतार लोककला पूर्वीसारखी सुरू करावी याबाबत आमदार नितेश राणे यांना दशावतारी चालक मालक संघटनेचे निवेदन.!

कुडाळ /-कोरोना महासंकटात गेले सात महिने बंद पडलेली कोकणची दशावतार लोककला पुन्हा सुरू होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.सातासमुद्रापार पोचलेली कोकणची दशावतार लोककला मार्च 2020 पासून कोरोना महासंकटात सापडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत 90 ते 100 दशावतार नाट्यमंडळे ही कित्येक वर्षांच्या लोककलेची जोपासना करत आहेत. गेले सात महिने कोरोना या जागतिक महासंकटामुळे ही कला बंद असल्याने येथील येथील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे .अनेक कुटूंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. आता तर अवघ्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांवोगावी जत्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.जिल्ह्यात कार्यरत प्रत्येक दशावतार नाट्यमंडळाचा त्या त्या गांवात दहीकाल्याची सांगता त्या त्या कंपनीच्या दशावतार नाटकांनी होते ,आणि या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षाच्या प्रथानुसार आड़दशावतार सादर केला जातो .ही लोककला सुरू व्हावी तसेच कलावंताच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची त्यांच्या ओमगणेश निवासस्थानी भेट घेतली.यावेळी ही कला सुरू व्हावी याबाबत चर्चा झाली यावेळी संघाचे,उपाध्यक्ष-नाथा नालंग-परब, सचिव – सचिन पालव ,सहसचिव-सुधीर कलिंगण, खजिनदार – देवेंद्र नाईक,बाबा मेस्त्री,मारुती सावंत,सुधा दळवी, नाना प्रभू,गौरव पार्सेकर ,सोनू दळवी उपस्थित होते.यावेळी आमदार श्री राणे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या कोविड-19 ने संपूर्ण जगतात हाहाकार माजविला असून सर्व व्यवसाय, कला ठप्प झाल्या आहेत. त्याची झळ कोंकणच्या दशावतार या कलेला सुद्धा पोहोचली आहे. मार्च २०२० पासून आज मितीपर्यंत हा व्यवसाय (कला सादरीकरण) पूर्णपणे बंद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे 90ते 100 दशावतार नाटयमंडळे आहेत. एका मंडळात कमीतकमी २० कलाकारांचा समावेश असतो. आज जवळ जवळ २००कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. एकूण कलाकारांपैकी ८०% कलाकारांचे उपजिवीकेचे साधन दशावतार कला हेच आहे. मुख्य व्यवसाय मार्च ते में हा ९० दिवसांच्या कालावधीत हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला त्याची झळ सर्वच कलापथकांच्या मालकांना व कलाकारांना पोहोचली आहे.सध्या बरेच व्यवसाय छोट्या-मोठ्या प्रमाणावर सरकारकडून केले जात आहेत. परंतु नवरात्रौत्सव पासून सुरु होणारा आमचा कला सादरीकरणाचा व्यवसाय सुरु होणार की नाही याबाबत मात्र सर्व मालक य कलाकार यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे
राहिले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या दशावतार नाट्यप्रयोग सादरीकरणाचा व्यवसाय आपल्या प्रयत्नातून सुरु करावा. सदर व्यवसाय सुरु झाल्यावर कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी जास्तीत-जास्त खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू तरी आमचा हा व्यवसाय आपण सुरु करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी मागणी केली याबाबत आमदार श्री राणे यांनी ही लोककला सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले आहे.

अभिप्राय द्या..