वैभववाडी /-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावा यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत.या शासकीय महाविद्यालयाला महा विकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे,अशी माहिती शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी दिली.वैभववाडी संभाजी चौक येथे शिवसेनेच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला.या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवाशिवसेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत – पालव ,माजी जि. प.सभापती संदेश सावंत ,जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके ,जि. प.सदस्य दिव्या पाचकुडे,माजी सभापती लक्ष्मण रावराणे, माजी उपसभापती अंबाजी हुंबे,तालुका महिला आघाडी प्रमुख नलीनी पाटील, प्रदीप रावराणे,दीपक कदम, दर्शना पाटील दिपक पाचकुडे व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा वासियांची गेले अनेक वर्षापूर्वीची जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे अशी मागणी होती.ही मागणी आज सत्यात उतरली आहे.जिल्हा वासीयांची स्वप्नपूर्ती झालेली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे,खा.विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत,माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गेले अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री महोदय यांनी सकारात्मक विचार करून मान्यता दिली आहे.येत्या काही दिवसांमध्ये या शासकीय महावैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन जिल्हा मुख्यालय ओरोस येथे होणार आहे .गेल्या आठ महिन्यापासून जगभरासह भारत देश व महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे जागतिक महामारी निर्माण झाली आहे . महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव निर्माण झाला .या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे व महा विकास आघाडी सरकारचे सर्व नेतेमंडळींनी याचा सामना केला आहे.जनतेचे आरोग्य निरोगी राहावे कोरोना संसर्गावर उपाययोजना जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासाची संकल्पना महाविकसआघाडी सरकारने सत्यात उतरवली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय ओरोस येथे कोविड लॅब, ऑक्सीजन प्लांट विविध औषधांचा पुरवठा मंजूर केला .कोल्हापूर व गोवा या ठिकाणी कोरोना तपासणी करण्यासाठी स्वब पाठवावे लागत होते ,रिपोर्ट मिळण्यासाठी तीन-चार दिवस वाट बघावी लागत असे.,याचा महाविकस आघाडी सरकारने विचार करून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम केली आहे.सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांची भात शेती ,नाचणी, भुईमूग यासारखी पिके जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या बाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून या आसमानी संकटात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्याची माहिती दिली आहे.पालकमंत्र्यांनी याबाबत तत्काळ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेतीचे व अन्य पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page