सिंधदुर्गनगरी /-

मार्च २०२० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाटके बंद आहेत त्यामुळे दशावतारी मंडळाच्या गाड्या उभ्या आहेत. काही गाड्यांचे पासिंग संपली आहेत त्यामुळे शासनाने या गाड्यांच्या करत सवलत द्यावी अशी मागणी भाजप जिल्ह्याध्यक्ष राजन तेली यांनी दशावतारी मंडळाच्या वतीने आज जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांकडे केली यावेळी त्यांच्या सोबत दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथ नालंग, सचिव सचिन पालव, सहसचिव सुधीर कलिंगण, खजिनदार देवेंद्र नाईक, सुधा दळवी, सुवर्णकुमार मोचेमाडकर, बाबा मेस्त्री, सोनू दळवी,वैभव तोटकेकर आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात संघाने म्हटले आहे कि,
सिंधुदुर्ग जिल्हात आज सुमारे ७०-८० मंडळे कार्यरत आहेत. साधारणतः ऑक्टोबर ते मे असा दशावतार कलेचा हंगाम असुन सन मार्च २०२० पासून आजमिती पर्यंत सदर व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आणि अजुन केव्हा सुरू होईल हे देखिल अशास्वत आहे. परंतु प्रतिवर्षाप्रमाणे सदर मंडळांच्या गाङ्या पासिंग करण्याची मुदत जवळ जवळ सर्वच मंडळाची आलेली आहे. पण कोरोनाच्या ह्या काळात सदर गाड्या पासिंग करणे सर्व चालक मालकांना कठीण आहे. तरी आमची एवढीच विनंती आहे की आमच्या मंडळाच्या गाड्या पासिंग करताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात तसेच काही करांमध्ये(व्यवसाय कर) सुध्दा सवलत मिळावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page