ब्युरो न्यूज /-

अमेरिकेतील संशोधकांनी एक असा पक्षी शोधला आहे.ज्याच्यामध्ये नर आणि मादी अशा दोन्हींची लक्षणे आहेत.रोज-ब—ेस्टेड ग्रूजबीक्स नावाच्या या पक्ष्याच्या एका भागात नर पक्ष्यांसारखे काळे आणि मोठे पंख आहेत तर दुसर्‍या भागात मादीसारखे तपकिरी आणि पिवळसर पंख आहेत. त्याच्या छातीवर कोणताही ठिपका नाही व हे मादीचे लक्षण आहे.

पेनसिल्वानियाच्या पावडरमिल नॅचरल रिझर्व्हच्या संशोधकांनी म्हटले आहे की नराच्या दोन शुक्राणूंपासून जर मादीचे दोन केंद्रक असलेले अंडे फलित झाले तर असा जीव विकसित होतो. त्यामध्ये नर आणि मादी अशा दोन्हीचे गुणसूत्रे येतात. या पक्ष्यामध्ये अंडाशयही असते.पक्ष्यांची शिरगणती करीत असताना हा अनोखा पक्षी आढळून आला.

या प्रजातीचे पक्षी उत्तर अमेरिकेत आढळतात. त्यांनी स्थलांतर केले तर ते मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत जातात. सर्वसाधारणपणे या पक्ष्यांमधील डाव्या बाजूचे अंडाशयच सक्रिय असते व या पक्ष्यातही डावी बाजूच मादीची आहे. तिथेच त्याचे अंडाशयही आहे. त्यामुळे हा पक्षी अंडीही देऊ शकतो व प्रजननही करू शकतो. एनी लिंडसे या संशोधिकेने सांगितले की भविष्यात हा पक्षी नरासारखे वर्तन करील की मादीसारखे हे त्याच्या आवाजावर अवलंबून असेल.जर तो नरासारखे गाऊ लागला तर त्याच्याकडे माद्या आकर्षित होतील किंवा तोच एखाद्या गाणार्‍या नराकडे आकर्षित होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page