✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे.

मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन , असे अभिवचन दिले होते . त्याचीच पुर्तता म्हणुन तुळजापूर – अक्कलकोट – पंढरपूर – नृहसिंहवाडी – महालक्ष्मी कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे वारकरी संप्रदायातील मंडळींमध्ये उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page