उमेद मार्फत बँक स्थापनेसाठी राज्य सरकार देणार 100 कोटी रुपयांचे भांडवल..

सिंधुदुर्ग /-

उमेद संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.याबाबतची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे.तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे.तसेच कमी केलेल्या 123 कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतले आहे.त्याबाबतचाही शासन निर्णय काढण्यात आला आहे. उमेदच्या महिलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत.महाराष्ट्रातील बचत गटांना ताकद देण्यासाठी उमेद मार्फत बँक काढण्यासाठी 100 कोटी रुपयांचे भांडवल देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. अशी माहिती पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली.

उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.पालकमंत्री ना.उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मोर्चा स्थळी भेट देत महिलांशी संवाद साधला. मागणी पेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.तसेच राज्य सरकार मार्फत अजून काही लाभ मिळवून देण्यासाठी नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत संघटनेची बैठक लावण्याची ग्वाही ना.उदय सामंत यांनी दिली.आपल्या मागण्या मान्य झाल्याने महिलांनी घोषणा देत आंनद व्यक्त केला.

यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,जि.प गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page