▪️भाजपचे संजय वेंगुर्लेकर दादा साईल यांची कुडाळ येथील पत्रकार परिषदेत माहिती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज कुडाळात ९ ऑक्टोबरला-दादा साईल भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2023 मोठ्‌या उत्साहात आणी दिमाखात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमानी आणी कार्यक्रमानी साजरा होत आहे. ९ सप्टेंबरला प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होणार असून 15 ऑक्टोबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर सुप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयाल यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमाने आयोजित अशा “विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विशाल परब यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमानी साजरा होत असता. यावर्षी यानिमित्ताने “विशाल सप्ताह” साजरा करण्यात येणार असून 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर याकालावधीत तब्बल एक आठवडा संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबर ला कुडाळ येथील श्री. वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे संध्याकाळी पाच वाजता विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या “विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभारंभ माजी खासदार आणि कुडाळचे भाजप प्रभारी निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात आणी हजारो वारकरी श्रोत्यांच्या संध्याकाळी ६ ते ९ अशा वेळेत होणार आहे.

११ सप्टेंबर २०२३ ला होममिनिस्टर स्पर्धेत दोडामार्ग येथे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन स्त्री शक्तीचा मान-सन्मान केला आहे. तसेच महिलांचे आज राजकारणात, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान असून त्यांचा मोलाचा वाटा आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर असलेल्या दोडामार्ग येथे भव्य दिव्य अशा “होम मिनिस्टर” या महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

१३ ऑक्टोबर ला वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडियम येथे “विशाल दांडिया” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय भव्य दांडिया स्पर्धेमध्ये नामांकित संघ भाग घेऊन सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच भव्य दिव्य अशी दांडिया स्पर्धा असून या स्पर्धेला हजारो दर्शकांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

१५ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयला आपल्या सावंतवाडी नगरीत दाखल होणार आहेत. सर्वांचे लाडके नेतृत्व विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने सावंतवाडी जिमखाना मैदानावर जगप्रसिद्ध गायक जुबीन नोटीयला याचा LIVE CONCERT हा जगातील नंबर वनचा लाईव्ह गाण्याचा शो होणार आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र आणी गोव्यात हा शो होत आहे. सुमधूर संगीताने जगातील तरुण-तरुणींना भुरळ घालणाऱ्या ज्युबीन नौटीयलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. या निमित्ताने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल आणी संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page