जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते कोवीड रुग्ण मदत कक्ष उद्घाटन..

जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते कोवीड रुग्ण मदत कक्ष उद्घाटन..

सिंधुदुर्ग /-

कोवीड रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता शिवसेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालय समोर रूग्ण मदत कक्ष उभारण्यात आले असून या कक्षाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री सतीश सावंत, युवा नेते श्री संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विकास कुडाळकर, जिल्हा परिषद गटनेते श्री नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख सौ जान्हवी ताई सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, डॉ प्रविण सावंत, परशुराम परब, ओरोस विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, संकेत पांगम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने कोवीड रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी,पपई, सफरचंद ईत्यादी देण्यात येणार आहे.तसेच रुग्ण व नातेवाईक यांच्यातील दुवा म्हणून काम केले जाणार आहे.

अभिप्राय द्या..