‘प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेसाठी २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर..

‘प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेसाठी २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर..

कुडाळ /-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आत्मनिर्भर ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवली गेली आहे याचा उद्द्या कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता या योजनेचा समारोप हा भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव श्री.विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.या आत्मनिर्भर या योजनेवर भाजपचे राष्ट्रीय सचिव श्री.विनोद तावडे यांचे 45 मिनिटांचे भाषण होणार आहे ,हे सर्व ठिकाणी एकाच वेळी,फेसबुक,यूट्यूब, च्या माध्यमातून प्रसारित होणार आहे.असे भाजपचे नेते जिल्हा बँक संचालक श्री.अतुल काळसेकर यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथील नियोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना काळसेकर म्हणाले की,मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे.या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त मच्छिमार बांधवानी घेऊन आत्मनिर्भर बना, असे आवाहन आत्मनिर्भर अभियानाचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक तथा जिल्हा बँक संचालक श्री.अतुल काळसेकर यानी सांगितले.यावेळी काळसेकर यांच्या सोबत भाजपचे नेते श्री.बंड्या सावंत ,प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष श्री.विनायक राणे,नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली,नगरसेवक श्री.सुनील बांदेकर ,भाजपा उवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..