आचरा /-

खराब झालेल्या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करणे,स्ट्रीट लाईट गेलेले बल्ब बदलने,वहाळावरील संरक्षक भिंत बांधणे आदी कामांच्या पुर्तते बाबत वायंगणी ग्रामपंचायत येथे विचारणा करण्यास गेलेल्या पाटवाडी ग्रामस्थांना सरपंच, ग्रामसेवक व काही सदस्यांनी उत्तर देण्याचे टाळत सरपंच दालनात जात दार बंद करून घेतल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी स्वखर्चानेच रस्त्याची साफसफाई करून घेतली.या बाबत वायंगणी सरपंच संजना रेडकर यांच्याशी संपर्क साधल्यावर विद्युत बल्ब लावण्याचे काम करणारा कर्मचारी उपलब्ध नसल्याने काम रेंगाळले होते.पण तीन दिवसांपासून बल्ब लावण्याचे काम सुरू झाले आहे.सदस्यांच्या म्हणण्यानुसार दर मासिक मिटींगला दरवाजा अर्धवट बंद केला जातो ग्रामस्थ आले म्हणून बंद केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वायंगणी पाटवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार वायंगणी पाटवाडी रस्त्यालगत दाट रान वाढल्याने प्रवास करताना सरपटणारया जनावरांची भिती, तसेच झाडी वाढल्याने वळणावर समोरून येणाऱे वाहन दिसू शकत नसल्याने अपघाताचीही शक्यता निर्माण झाली होती. या बरोबर रस्त्याची स्ट्रिट लाईटही बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. या बाबत वायंगणी ग्रामपंचायत येथे विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांना उत्तर देण्याचे टाळत उपस्थित सरपंच , ग्रामसेवक, काही सदस्य यांनी सरपंच दालनात जात दरवाजा बंद करून घेतल्याचा आरोप पाटवाडी ग्रामस्थांनी केला आहे.या मुळे संतापलेल्या पाटवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत स्वखर्चाने रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई करून घेतली आहे. या वेळी पाटवाडी येथील गणेश सावंत,चंदु सावंत, निशांत सावंत,सर्वेश परब, दिपक सावंत, विशाल सावंत, प्रशांत सावंत,रोहन सावंत,निक्लेश मालपेकर विजय सावंत एवढे ग्रामस्थ सोशल डिस्टंसच पालन करून उपस्थित होते

या बाबत वायंगणी सरपंच संजना रेडकर यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा रस्ता असल्याने खराब साईडपट्टीसाठी ग्रामपंचायत खर्च करू शकत नसल्याने या बाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. बल्ब लावण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने काम रेंगाळले होते.पण मागिल तीन दिवसांपासून कर्मचारी उपलब्ध झाल्यावर साठ बल्ब लावण्याचे काम केले आहे. तसेच भेटायला आलेल्या ग्रामस्थांमुळे सरपंच दालनाचा दरवाजा बंद केला नसुन सदस्यांच्या म्हणण्यानुसार मिटींग साठी दरवाजा अर्धवट बंद केला जातो तसा बंद केला होता.असे स्पष्टीकरण सरपंच संजना रेडकर यांच्या कडून देण्यात आले आहे.मात्र ग्रामपंचायतीकडून कार्यवाही होईल याची वाट न बघता वायंगणी पाटवाडी ग्रामस्थांनी स्वखर्चाने रस्ता दुतर्फा साफसफाई करत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page