✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग सामील जळवी.

बजाज फायनान्स कंपनीकडून ७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी कणकवली येथील तक्रारदार सचिन सावंत यांना ५०हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र सिंधुदूर्ग सायबर पोलिसांनी आपल्या सतर्कतेने ही रक्कम २४ तासात त्याना परत मिळवून दिली आहे.

कणकवली येथील सचिन सावंत यांना पैशाची गरज असल्‍यामुळे मोबाईल व्‍दारे ऑनलाईन लोन बाबत सर्च केले असता, त्‍यांना बजाज फायनान्‍स कंपनीचा नंबर प्राप्‍त झाला सदर क्रमांकावर सचिन सावंत यांनी कॉल केला असता आपल्‍याला पाहिजे असलेले लोन अप्रुव झालेले आहे परंतू त्‍यासाठी आपल्‍याला प्रोसेसिंग फि ५० हजार तात्‍काळ भरावी लागेल असे कस्‍टमर केअर यांनी सांगितले .पैशाची तात्‍काळ गरज असल्‍यामुळे सचिन सावंत यांनी सदरचे ५० हजार तात्‍काळ कस्‍टमर केअर यांनी सांगितलेल्‍या खात्‍यावर जमा केले. तद्नंतर त्‍यांनी बजाज फायनान्‍स, कणकवली येथील शाखे भेट दिली असता त्‍यांना त्‍यांचेशी कॉलवर बोललेली व्‍यक्‍ती येथे कोणीही नसून आपली फसवणूक झाली असल्‍याचे लक्षात आल्‍याने सचिन सावंत यांनी तात्‍काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर व्‍दारे आपली फसवणूकीची तक्रार नोंदविली असता सायबर पोलीस ठाणे च्‍या टिम ने तात्‍काळ आयसीआयसीआय बँक व राझोर पे यांचेशी संपर्क साधून तक्रारदार यांची फसवणूकीची सर्व रक्‍कम रूपये ५०,०००/- त्‍यांना २४ तासांचे आत परत केले.सदर तक्रारीचा तांत्रिक तपास जिल्‍हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, पोलीस कॉन्‍टेबल स्‍वप्निल तोरस्‍कर, माहिला पोलीस कॉन्‍स्‍टेबल धनश्री परब यांनी केला. आपला ATM पिन अथवा ओटोपी कोणासही शेअर करून नये तसेच कोणी सायबर ऑनलाईन फ्रार्डला बळी पडला असल्यास त्याने तात्काळ जवळीस पोलीस ठाणे किंवा National Cyber Crime Reporting Portal / १९३० च्या माध्यमातून तक्रार करावी असे आवाहन सायबर पोलीस ठाणे तर्फे करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page