अपघातातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

देवगडकडे लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारे बोलेरो पिकअप वाहन (एम.एच 07 ए.जे.2945) आज दुपारी वागदे येथील वक्रतुंड हॉटेल समोर पलटी होवून झालेल्या अपघातात एकूण 45 व्यक्तींपैकी 12 जण गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर 33 जणांना उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे दाखल करण्यात आहे. अपघाताचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सविस्तर माहिती मागवून घेतली. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे भेट देवून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस केली. त्यांच्या नातेाईकांशी संवाद साधला. जखमी झालेल्या सर्व व्यक्तींना तातडीचे व वैद्यकीय उपचार त्वरीत देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

एकूण 45 जणांपैकी अनंत धोंडू गुरव,(वय 55), मनिषा महेश गुरव (वय 30), मनिषा रविंद्र गुरव(वय 46), सुनिता शिवाजी गुरव(वय 17), सचिन सदाशिव गुरव(वय 30),प्रणिता विष्णू गुरव (वय 50) रोषनी रमेश राघव (वय 23), संजना संदीप गुरव (वय 20), विजया विजय गुरव(वय 50),अनिता सुरूश गुरव (वय 50), चिराग विनोद गुरव(वय 12)आणि विष्णू वामन गुरव (वय 52 सर्व रा. पाटगाव) या 12 जणांवर ओरोस येथे उपचार सुरु आहेत. तर तेजा सुहास गुरव (वय 12), सुचिता रामा गुरव (वय 55), सानिका संतोष गुरव (वय 30) विजय शांताराम गुरव (वय45), दक्ष दिनेश गुरव (वय16), संजिवनी संदीप गुरव, अनिता लक्ष्मण गुरव, जयश्री नारायण गुरव(वय60), सुषमा दिपक गुरव(वय55), अस्मी शिवाजी गुरव (वय 12),विजय वसंत गुरव (वय 40), संस्कार तुकाराम गुरव (वय 18),आरोही रविंद्र गुरव(वय 10), शिवानी शिवाजी गुरव (वय 40), रुपाली रामचंद्र गुरव (वय 40), बाबला सखाराम गुरव (वय 65), सुविधा बाबला गुरव (वय 60),अस्मिता अजय गुरव (वय 40) अनिता अनंत गुरव (वय 45), मानसी सुहास गुरव (वय 19), सचिन वसंत गुरव (वय 43), महेश अंतु गुरव (वय 40), प्रतिभा बाबू गुरव (वय40)पार्थ जितेंद्र गुरव (वय9), कलावती काशिराम गुरव(वय25), प्रियाका रामचंद्र गुरव (वय22), सविता बाबूराव गुरव (वय 60),स्मीता गुरव, सिध्देश सीताराम गुरव (वय 25), अनिता विजय गुरव (वय 25), तेजस्वी गुरव (वय 13), वाहन चालक गुरुनाथ काशिराम गुरव (वय 27),मेघा मारुती गुरव (वय 55 रा. सर्व पाटगाव) या सर्वांवर कणकवली येथे उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page