वेंगुर्ले /-

वेंगुर्ले नगर परीषदेकडून नगरातील नळपाणी योजनेच्या ग्राहकांना अनेक दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून या पाण्याची पाणी पट्टीही शासनाच्या नियमानुसार वसुल केली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात देशात स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या वेंगुर्ले नगर परीषदेतील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही हे दुर्दैव आहे. या बाबत झोपी गेलेल्या नगर परीषद प्रशासनाला व लोकप्रतिनिधींचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लेखी निवेदनाव्दारे वेधले आहे.

वेंगुर्ले नगर परिषद हद्दीतील नागरिकांना नगर परिषदेमार्फत शासनाच्या सेवा सुविधा देण्याची जी अत्यावश्यक व जीवनावश्यक बाब असलेल्यांपैकी एक म्हणजे पाणी. परंतु गेल्या अनेक दिवसापासून नळकनेक्शन ग्राहकांना सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत या कालावधीत गढूळ व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा केला जात आहे आणि या पाण्याचे बिल वेंगुर्ले नगरपरिषद पाणीपट्टी म्हणून वसूल करीत आहे.

वेंगुर्ले नगर परिषद ही स्वच्छ भारत अभियानात देशात अग्रेसर असताना शहरातील नागरिकांना शासनाच्या निर्देशानुसार मूलभूत सोयीसुविधा देतील मुख्य घटक असलेले शुद्ध व स्वच्छ पाणी हे कोरोनाच्या भीषण महामारीच्या काळात देऊ शकत नाही. हे सुंदर व स्वच्छ वेंगुर्लेतील नागरिकांचे दुदैव्य म्हणावे लागेल. देशात अव्वल क्रमांक पटकावलेल्या वेंगुर्ले नगर परिषदेचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेच्या बढाया मारत असतात. पण आपल्या शहरातील लोकांना आपण नळपाणी योजनेद्वारे पाणीपट्टी घेऊन पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य आहे का? हे बघत नाहीत. अशा पिण्यायोग्य गढूळ पाण्याच्या वापराने शहरातील जनतेच्या आरोग्याचा हे प्रश्न उपस्थित होतो याला जबाबदार कोण? कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना अशा काळात नागरीकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळते का? हे पाहू शकणारे लोकप्रतिनिधी कर्मचारी आपली नगर परिषद नळपाणी योजना नागरिकांना पाणीपट्टी घेऊन गढूळ पाणी पुरवते. यावर लक्ष देऊ शकत नाही. मूलभूत सोयी सुविधांकडे लक्ष देऊन शकत नाही. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, शहरात वाढता मच्छर चा प्रभाव, खराबरस्ते व मार्केटचा प्रश्न अशा विविध समस्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नसतील तर असे लोक प्रतिनिधी वेंगुर्ले शहरवासीयांच्या काय कामाचे? त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत. कारण नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता अभियानात मिळवलेल्या कोट्यावधीच्या बक्षिसाच्या रकमेतून जर नागरिकांना आपण शुद्ध व स्वच्छ पाणी देऊ शकत नाही तर या बक्षिसाचा नागरिकांना काय उपयोग? शासनाने स्वच्छतेतून मिळवलेली बक्षिसाची रक्कम नागरिकांच्या मूलभूत सेवासुविधा वर खर्च करण्यास कोठेही विरोध केल्याचे दिसून येत नाही.

वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांनी नळपाणी योजनेच्या मार्फत पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची खात्री करून दोषी असणाऱ्या वर तात्काळ कारवाई करावी तसेच तत्परतेने शहरवासीयांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात आवश्यक असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष नगर परिषद पूर्ण सहकार्य करेल तसेच जोपर्यंत नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्यायोग्य पाणीचा पुरवठा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी आकारली जाऊ नये. मार्ग 2020 ते आतापर्यंत आकारलेली पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी. अशी आमची मागणी आहे.

पाणी हा नागरिकांच्या जीवनाचा व आरोग्याचा प्रश्न असल्याने याची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपरिषद कार्यालयामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अमित कुमार सोंडगे यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन सादर करतेवेळी उपस्थित महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल, तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर, जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा सदस्य नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, संजय निराधार योजना समिती सदस्य मकरंद परब, प्रदिप पडवळ, सुहास मांजरेकर, स्वप्नील रावळ, हर्षद पालकर यांचा समावेश होतो.
फोटोओळी. वेंगुर्ले. वेंगुर्ले नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमित कुमार सोंडगे यांना निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सत्त्यवान साटेलकर. सोबत नम्रता कुबल, नितीन कुबल, प्रसाद चमणकर, वामन कांबळे, हर्षद पारकर,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page