✍🏼लोकसंवाद /- मालवण.
मालवण तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. वक्रतुंड वस्त रुजू झाले आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे विशेष समिती सदस्य तथा नगरपरिषद माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्याने आता मालवण ग्रामीण रुग्णालायत दोन वैद्यकीय अधिकारी रुजू असणार आहेत. डॉ. वक्रतुंड वस्त रुजू झाल्यानंतर माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या तर्फे त्यांचं सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप पळसबकर, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, सौ. शिल्पा यतीन खोत, यशवंत गांवकर, रूपा कुडाळकर, शांती तोंडवळकर, सौ. आर्य गांवकर, पूजा तळाशिलकर, साक्षी मयेकर, आहना तळाशिलकर, हर्षदा पडवळ, भाई कासावकार आदी उपस्थित होते.