वेंगुर्ले शहर एरियातील १०६ व्यक्ती कोरोनामुक्त;आज एवढे कोरोना रुग्ण सापडले..

वेंगुर्ले शहर एरियातील १०६ व्यक्ती कोरोनामुक्त;आज एवढे कोरोना रुग्ण सापडले..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी केलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.आजच्या अहवालात तुळस येथे २ व्यक्ती या पॉझिटिव्ह संपर्कातील असून वेंगुर्ले
शहरातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.तालुक्यात आतापर्यंत ३३५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असून २५८ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत.७० व्यक्ती उपचाराखाली आहेत.ग्रामीण भागात २०५ रुग्ण आढळले असून १५२ बरे झाले आहेत.वेंगुर्ले शहर एरियात १३० रुग्ण आढळून आले असून १०६ व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत.ग्रामीण भागातील ४८ व्यक्ती व शहरी भागातील २२ व्यक्ती उपचाराखाली आहेत.

अभिप्राय द्या..