वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतच्या सरपंचा समिधा जनार्दन कुडाळकर यांच्याविरुध्द अविश्वास ठराव ९ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला आहे. आडेली ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विशेष सभेत सरपंचाविरुध्दच्या अविश्वास ठरावावर ९ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर अविश्वास ठरावाच्या विरुध्द सरपंच व अन्य १ सदस्य असे दोन मतदान झाले. त्यामुळे ९ विरुद्ध २ मतांनी हा ठराव मंजुर करण्यात आला.या सभेस १ सदस्य अनुपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page