कणकवली /-
रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम तात्काळ सुरु केले जाईल, ज्या ठेकेदारांची कामे अर्धवट आहेत त्या ठेकेदारांना करणे दाखवा नोटीस बजावली जाईल व दंडही केला जाईल आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळण्यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर मसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर संजय शेवाळे यांनी दिल्यानंतर मनसेने आजचे बांधकाम विभाग कणकवली कार्यालयासमोरील आंदोलन मागे घेतले आहे.
यावेळी संजय शेवाळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी मसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, उपजिध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाप्रमुख दत्ताराम बिडवाडकर,
कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, विध्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका अध्यक्ष मालवण विनोद सांडवआदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रस्त्यांना पडणारे खड्डे खरेदी करुन ठेवलेल्या पावसाळी डांबराने भरण्याबाबत ज्या कामांचे २ वर्षे व ५ वर्षे दायित्व आहे. त्या कामांचे ठेकेदाराकडुन खड्डे भरुन दुरुस्ती करुन घेणे, ज्या कामांचे यावर्षी पावसापूर्वी केलेल्या रस्त्यांचे बी.एम.वॉशआऊट झाले. त्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी कणकवली कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अधीक्षक अभियंता यांनी चर्चेला न येता माणसे पदाधिकाऱ्यांना उद्धट उत्तरे दिल्याने आज पुन्हा मानधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयासमोर मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन केले.
दरम्यान यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्याशी अधीक्षक अभियंता यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांच्याकडे या पदाचा प्रभारी चार्ज असल्याने त्यांनी आपल्या मागण्या अधीक्षक अभियंता येतील तेव्हा त्यांच्यापर्यंत पोचवतो असे आश्वासन दिले. तर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर संजय शेवाळे यांनी पावसाळा संपला कि मार्गावरील खड्डे डांबराने भरतो तोपर्यंत हे खड्डे भरण्याचे काम करतो. या कामाला तातडीने सुरवात करतानाच अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. यानंतर मनसेने आपले आंदोलन स्थगित केले आहे.