लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

शनिवार दिनांक २१ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा ची डाटा व्यवस्थापन व उपयोग बैठक केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महीलाभवन – ओसरगाव , कणकवली येथे संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजन तेली , आमदार नितेशजी राणे , माजी आमदार अजितराव गोगटे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक अतुलजी काळसेकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व मनोज रावराणे , युवा मोर्चाचे भाई सावंत , प्रज्ञा मंचचे डॉ.मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते .

डाटा व्यवस्थापन विभागाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी अभियानाची माहिती दिली.तसेच अभियानाचे चार टप्पे समजावून सांगितले . तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणूका तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून या विषयाकडे बघणे आवश्यक असल्याचे सांगितले .

या बैठकीत जिल्हा पदाधिकारी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य , तालुकाध्यक्ष , विविध मोर्चा – आघाडी – सेलचे पदाधिकारी व आजी / माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते .
या बैठकीत डेटा व्यवस्थापन आणि उपयोग जिल्हा समीतीचे सह – संयोजक प्रभाकर सावंत , आईटी ( IT ) चे केशव नवाथे , सोशल मीडिया चे समिर प्रभुगांवकर , जिल्हा संवादक सौ.स॒ई चेंदवनकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page