लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील माजी उपसरपंच, कट्टर शिवसैनिक श्री.विजय वारंग यांच्या सह असंख्य शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेशजी राणे यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी खासदार निलेश राणे जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, युवा मोर्चा जिल्हाप्रमुख योगेश उर्फ भाई सावंत, एडवोकेट बंड्या माडकुलकर, दीपक नारकर, राजा धुरी, बंड्या सावंत, रुपेश कानडे, पप्या तवटे, विनायक राणे, आनंद शिरवलकर, दादा साहिल व मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ कार्यकर्ते तसेच कुडाळ भाजपा पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.