✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
दुर्ग मावळाची ची स्थापना ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून कोणत्याही जाती धर्माच्या वादात अडकत न बसता फक्त शिवकार्यासाठी साकार झालेली एक संघटना आहे.सन १६६२ पासून या शहरावर शिवाजी महाराजांचं वर्चस्व होतं.शिवकाळात १५ जून १६६३ च्या सुमारास शिवाजी महाराज बांदा येथे येऊन गेल्याचा उल्लेख एका इंग्रजी पत्रात येतो.
१६६४ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान महाराजांनी खवासखानाचा पराभव केला व कुडाळ परगण्यातील आदिलशाहीचे बस्तान उठवले.
या काळातच बांदा प्रांत मराठयांच्या ताब्यात आला.याच बांदा प्रांतातील रोजे घुमट या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन व स्वच्छता मोहीम आज दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत आयोजित करण्यात आली.या मोहिमेत घुमटाची खालील समोरील व डाव्या बाजूची स्वच्छता करण्यात आली. तसेच पायाच्या वरच्या पूर्ण भागाची स्वच्छता करण्यात आली. घुमटावर वाढलेली झाडी, दारू, पाण्याच्या बॉटल्स याची स्वच्छता यावेळी करण्यात आली. उर्वरित भागाची स्वच्छता पुढील मोहिमेत करण्यात येणार आहे.सदर मोहिमेस गणेश नाईक, समिल नाईक, शिवाजी परब, योगेश एरम, वैभव परब, सातेरी करीलगेकर, गार्गी नाईक,शितल नाईक आदींनी सहभाग घेतला.