लोकसंवाद /-कुडाळ.अमिता मठकर

विद्यार्थ्यानी कविता कथा व कविता यांचे वाचन करावे.कविता व कथा सादरीकरणाची तंत्रे समजून घ्यावीत. साहित्याची विविध रूपे समजून घ्यावीत व त्यांचे वाचन करावे. असे प्रतिपादन लेखिका वृंदा कांबळी यानी पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर केले.कथाकथनाची दशसूत्री विद्यार्थ्याना सांगितली.मंगेश पाडगावकर विंदा करंदीकर अशा कवींच्या कवितांचे दाखले देत त्यातील सौंदर्य उलगडून दाखवले.
कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखा व एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट यांचे पाट हायस्कूल यांच्या स॔युक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना श्री. साळसकर सरांचे प्रार्थना पुस्तक आणि पेन भेट देण्यात आले .कोमसाप कुडाळ शाखेने शाळा तेथे कोमसाप या उपक्रमाद्वारे शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्याना साहित्याची आवड निर्माण होऊन त्यानी वाचन करावे यासाठी कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. याचाच भाग म्हणून पाट हायस्कूलमध्ये शुभारंभाचा कार्यक्रम झाला.यामध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक शामराव कोरे यानी केले. कुडाळ कोमसाप सचिव सुरेश पवार , सहसचिव स्वाती सावंत , अॅड. रविकांत जाधव यानी आपले मनोगत व्यक्त केले. स्वाती सावंत यानी लहान मुलांसाठी लिहिलेल्या स्वरचित कवितेचे वाचन केले. मराठी विभागातील सौ शैवाली परब मॅडमनी शाळेत चालू असलेल्या मराठी विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली. शेवटी श्री संदीप साळसकर सरानी आभार मानले. स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी सूत्रसंचालन …. श्री सदगुरु साटेलकर..यानी केले. . श्री एकनाथ जाधव सौं दिपीका सामंत व इतर…शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद हे लाभला. संस्था चालकानीही या उपक्रमाचे कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page