लोकसंवाद /- वेंगुर्ला.

वेंगुर्ले तालुक्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास नॅकचे ‘ अ ‘ मानांकन प्राप्त झाले आहे. आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या या कॉलेजला हे नामांकन प्राप्त झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. वेंगुर्ले बॅरिस्टर खर्डेकर कॉलेजच्या या शैक्षणिक घोडदौडबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यमापन व अधिस्वीकृती परिषद बेंगलोर नॅकच्या तज्ञ समितीने नुकतीच भेट दिली होती. यावेळी नॅकच्या तज्ञ समितीकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात आले.या महाविद्यालयास सी – जी – पी – ए ३.२३ सह ‘ ए ‘ ग्रेड प्राप्त झाली आहे. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यमापन व अधिस्वीकृती परिषद, बेंगलोर नॅकच्या तज्ञ समितीने ११ व १२ जानेवारी २०२३ रोजी भेट दिली होती. यावेळी समितीचे चेअरमन डॉ. खाजा अल्ताफ हुसेन (हैदराबाद तेलंगणा), समन्वयक सदस्य डॉ. बी.एच.सुरेश (म्हैसूर, कर्नाटक) व सदस्य डॉ.  श्रीकांता सामंता (नबाग्राम, पश्चिम बंगाल) यांनी सर्व विभागांना भेटी देऊन महाविद्यालयाच्या कामकाजासंबंधी माहिती घेतली. नॅकच्या तज्ञ समितीकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात आले. आज १७ जानेवारी रोजी महाविद्यालयास सी -जी -पी – ए ३.२३ सह ‘ए’ ग्रेड प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा. जयकुमार देसाई,  चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांचे तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी. बी.राणे व सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट
यांचे कौतुक केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. डॉ. डी. एस. पाटील, प्रा. डॉ. एम. बी. चौगले, प्रा. एस. एच. माने, प्रा. डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रा. डॉ. बी. जी. गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी, पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  महाविद्यालयास ‘ए’ ग्रेड प्राप्त झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय मूल्यमापन व अधिस्वीकृती परिषद बेंगलोर नॅकच्या तज्ञ समितीने महाविद्यालय सर्व विभागांना भेटी दिली. यावेळी गेल्या ५ वर्षातील विविध बाबींच्या बाबतीत हे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, कॉलेजमधील शिक्षकांनी केलेले रिसर्च वर्क, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेले कोर्सेस, एनसीसी, एनएसएस, महिला विकास कक्ष, दूरशिक्षण विभाग आदींचे उपक्रम, प्राचार्यांचे प्रशासन, संस्थेचा सपोर्ट, मुंबई विद्यापीठामार्फत शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम, ग्रंथालयातील सुविधा, ई लर्निंग सुविधा, पर्यावरणपूरक कॅम्पस, पाणथळ जागा संवर्धन, पुरातन वस्तू यांचा संग्रह, लॅबोरेटरी, कॉलेजचा रिझल्ट आदी बाबतीत मूल्यांकन करण्यात आले.

वेंगुर्ले तालुक्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुने महाविद्यालय आहे.या महाविद्यालयत शिक्षण घेतलेले विद्यार्थी – विद्यार्थिनी देशासाठी योगदान देत आहेत. या महाविद्यालयाने वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रात प्रगती केली आहे. एनसीसी, एनएसएस आणि शिक्षक यांनी दिलेले योगदान यामुळे ‘बी’ ग्रेड वरुन ( सी – जी – पी – एस ३.२३) सह “ए ग्रेड” प्राप्त करू शकलो.यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संस्थेचे फार मोठे मोलाचे मार्गदर्शन, तसेच शिक्षक व आजी माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य – योगदान आहे. यापुढेही पुढील मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page