लोकसंवाद /- वेंगुर्ला.

वेंगुर्ले बसस्थानक श्री साई मंदिराचा २६ व्या वर्धापन उत्सवानिमित्त रविवार २२ व सोमवार २३ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रविवार २२ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. श्री गणेश पूजन व धार्मिक विधी, सकाळी ९ वा. वेंगुर्ले शहरात श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक, सायंकाळी ४ वा.वडखोल येथील सुश्राव्य भजन, ६ वा. महाआरती व पालखी मिरवणूक, ८ वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग. सोमवार २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. महारुद्र व जप सांगता, सकाळी १० वा. श्री साईबाबांची महापूजा, ११ वा. श्री साईंची महाआरती व महानैवेद्य, दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. श्री सिद्धेश्वर महिला भजन मंडळ खानोली यांचे भजन, सायंकाळी ६ वा. महाआरती व पालखी मिरवणूक, सायंकाळी ८ वा.राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त रा.प. महामंडळ सिंधुदुर्ग विभाग यांचा ‘ दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ हा बहारदार नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविकांनी दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page