मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे नवीन रुग्ण सापडले..

मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे नवीन रुग्ण सापडले..

मालवण /-

मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे तीन नवीन रुग्ण सापडून आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २७८ वर पोहोचली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० जणांच्या स्वॅबची कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यात केवळ कणकवली येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर टेस्ट च्या अहवालात मालवण तालुक्यातील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडून आले. यामध्ये वायरी भूतनाथ १ , श्रावण १ ,हिवाळे १ या रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या २७८ वर पोहोचली असून आतापर्यंत २१६ जणांनी कोरोना वर मात केली आहे. तालुक्यात सध्या ५२ सक्रिय रुग्ण असून आता पर्यंत १० जणांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

अभिप्राय द्या..