विमान दुर्घटनेत 22 शिकाऊ सैनिक ठार..

विमान दुर्घटनेत 22 शिकाऊ सैनिक ठार..

नवी दिल्ली /-

हवाई दलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. युक्रेनच्या लष्कराचे हे विमान असून या अपघातात 22 जण ठार झाले आहे. या मृतांसोबत अन्य दोन जण जखमी झाले असून चार जण बेपत्ता आहेत.युक्रेनच्या लष्करी विमानातून एव्हीएशन स्कूलचे विद्यार्थी प्रवास करत होते. An-26 हे विमान चुहुइव्ह विमानतळावर उतरताना कोसळले. युक्रेनची राजधानी क्यीव्हपासून 400 किमीवर ही घटना घडली आहे. हे विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर त्यानं पेट घेतला आणि परिसरात मोठे आगीचे लोळ उठले. या विमानात होते. 21 विद्यार्थी 7 विमानातील क्रू मेंबर्स असे एकूण 28 जण प्रवास करत होते.हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणी सध्या बचावकार्य सुरू असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अभिप्राय द्या..